Khed : तिसंगी येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना ७६ वर्षीय वृद्धावर कारवाई

खेड : तिसंगी येथील एका ७६ वर्षीय वृद्धाला सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता करण्यात आली. खेड तालुक्यातील बीजघर फाटा, पीकअप शेडजवळ आरोपी विठ्ठल गोविंद भोसले (वय ७६, रा. तिसंगी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना पोलिसांना आढळून आला.

त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या कारवाईसाठी पोलीस शिपाई आरती किरण डोंगरे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 16/Oct/2025