लांजा : गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पडायला सुरुवात केली. लांजा तालुक्यात बुधवारी ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे ऐन भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच अचानक पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
पाऊस गेल्याने लांजा तालुक्यात सद्या भात कापणीला वेग आला आहे. कडक उष्मा सुरू झाल्याने नागरिक हैराण होत आहेत. दिवसभर उष्मा वाढत असतानाच बुधवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या दरम्यान लांजा तालुक्यात जोरदार पाऊस पडला. तासभर पाऊस पडत होता. मात्र भातकापणीला पावसाचा अडसर आला आहे. पडलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात कापणी करून ठेवलेले भातपीक भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र पाऊस पडल्याने पंधरा दिवस वाढलेल्या गर्मीवर दिलासा मिळाला असून हवेत गारवा पसरला होता. शहरात महामार्ग कामाने पसरलेल्या धुळीपासून सुटका मिळाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 16/Oct/2025














