Ratnagiri : चवेतून बेपत्ता महिला नातेवाईकांच्या ताब्यात

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील चवे येथील दीप्ती दीपिकेश निंबरे ही महिला चवे या ठिकाणाहून ३ ऑक्टोबरपासून घराबाहेर पडून बेपत्ता झाली होती. तिला गणपतीपुळे पोलीस पथकाने मंगळवारी चांदवड-नाशिक येथून ताब्यात घेऊन बुधवारी तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

याबाबत तिचे पती दीपिकेश निंबरे यांनी ५ ऑक्टोबर रोजी आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार गणपतीपुळे चौकीत दिली होती. या महिलेचा तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी निलेश भागवत यांच्याकडे दिला. त्यानंतर दीप्ती निंबरे हिच्या तपासादरम्यान गणपतीपुळे पोलीस आणि पोलीस निरीक्षक संजय पाटील, तपासिक निलेश भागवत यांनी महिलेचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश भागवत, पुसाळकर यांच्या टीमने १४ ऑक्टोबर रोजी चांदवड-नाशिक येथून ताब्यात घेऊन बुधवारी तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 16/Oct/2025