लांजा : लांजा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांची भूमी अभिलेख कार्यालयाकडून खोळंबलेली कामे तसेच दिवाळी सनामध्ये महावितरणकडून विज खंडित होऊ नये यासाठी लांजा शहर समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
लांजा शहर समन्वय समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या भेटी मध्ये महावितरण व भूमीअभिलेक अधिकाऱ्याशी चर्चा करताना जन सुविधांबाबत चर्चा कारताना म्हटले की, नागरिकांची संबंधित व प्रलंबित कामे, सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, कर्मचारी वर्गाची कामाची तत्परता, नागरिकांशी कर्मचारी वर्गाचा होणारा संवादाचा अभाव, कार्यालयीन त्रुटी, कर्मचारी वर्गाचा अभाव, कार्यालयीन
वेळेतील कर्मचारी वर्गाचा उपस्थितीचा प्रश्न अशा विविध समस्यांवर भूमी अभिलेख उपअधीक्षक गोरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिक आणि भूमी अभिलेख यांच्या समन्वयाच्या माध्यमातून विविध कामासंबंधित शिबिर आयोजन करण्यातबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला.
यासह महावितरण कार्यालय येथे बैठकीत दिवाळी सनाच्या कालावधीत वीज खंडित होऊ नये अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली. वाडीवस्तीमधील विजेच्या वाहिन्यांवरुन जाणाऱ्या झाडांच्या फांद्या, झाडे यांचे पावसाळ्यापूर्वी निराकरण करणे, ज्या ज्या ठिकाणी वाडी वस्तीत विजेच्या खराब वीज खांब तत्काळ बदलण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 16/Oct/2025














