रत्नागिरी : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

रत्नागिरी : विधानसभेसाठी होऊ घातलेल्या निवडणूक कार्यक्रम कालपासून (२२ ऑक्टोबर) सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राची सक्ती केली जात असे त्यांची तपासणी केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याची कालपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी, अधिकारी तसेच नागरिकांची कसून तपासणी पोलीस करत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात प्रवेश करताना आपले ओळखपत्र घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर व शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी सर्वांची तपासणी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 23/Oct/2024