रत्नागिरी : शहराजवळील काळबादेवी येथील रस्त्यावर निष्काळजीपणे एसटी चालवून चालकाने दुचाकीला धडक दिली व घराचा बांध तोडल्याप्रकरणी संशयित एसटी चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण कुंडलिक फड (वय ४३, रा. द्वारकानगर, महालक्ष्मीनगर, रत्नागिरी) असे त्या संशयित एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित लक्ष्मण फड हे एसटी (एमएच २० बीएल १५८१) ही घेऊन रत्नागिरी ते काळबादेवी असे जात असताना एसटी निष्काळजीपणे चालवून तक्रारदार स्नेहल सुनील वारेकर (३६, रा. नवानगर, काळबादेवी, रत्नागिरी) यांच्या घरासमोरील बांध व पार्क केलेली दुचाकी (एमएच ०८ एके ९७८५) हिचे नुकसान केले. याप्रकरणी स्नेहल वारेकर यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 16/Oct/2025














