रत्नागिरी : काल रात्री उशीरा शिवसेना पक्षाकडून रत्नागिरी विधानसभेसाठी उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उदय सामंत हे मागील पाच टर्म निवडून येणारे आमदार आहेत. राज्यात महायुती कडून ही निवडणूक लढवली जात आहे. दिनांक २५ ऑक्टोबर रोजी उदय सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी प्रचंड शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. उबाठा कडून अजूनही उमेदवार जाहीर झाला नसल्याचे पहावयास मिळत आहे. उबाठा कडून उदय बने, राजू महाडिक व बाळ माने ही नवे चर्चेत आहेत. आज सायंकाळ पर्यंत हा उमेदवार ठरेल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 23/Oct/2024














