रत्नागिरी : दिवाळी सण अवघ्या दोनच दिवसांवर येवून ठेपला असून रत्नागिरीकरांकडून खरेदी सुरू आहे. दिवाळी बच्चे कंपनीकडून बाजारात फटाक्यांची मागणी वाढली आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील विविध बाजारात विविध प्रकारचे फटाके विक्रीस उपलब्ध आहेत. आकाशात उडणारा पाच रंगाचा पाऊस, भुईचक्र, ड्रॅगन, फुलबाजे, डांबरी, लाल फटाके, सुतळी बॉम्ब, चुटपूट, फूलबाजे, यासह मुलांना आवडणाऱ्या बुलेट बॉम्बसह १० हजार रूपयांपर्यंतच्या फटाक्यांच्या माळांनाही मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात फटाक्याची विक्री होत आहे.
दिवाळी निमित्त यंदा सर्वच वस्तू, साहित्याच्या किंमतीत वाढ होत आहे. आता फटाक्यांच्या दरात सरासरी १० ते १५ टक्के वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. हवेत उडणाऱ्या फटाक्यामध्ये साधा, ड्रगन व त्रिशुलसह म्युझीकल क्रॅक्स, भुईचक्र, चिटपुट, लक्ष्मी, चिमणी तोटा, विविध हिरो, नटीचे चित्र असलेले रॉकेट अशा फटाक्यांना मोठी मागणी वाढली आहे.
असे आहेत दर
फुलबाजे – १०० ते २५०
लहान मुलांसाठी बंदुका- ३० ते ६५०
शंभर नगाची माळ-१३०
१ हजार नगाची माळ-२५०
नागगोळी १० पाकिट
डबल बार-७०
रॉकेट – २५० रूपये १० नग
मोठे रॉकेट-४५० रूपयास १० नग
लाल फटाके, डांबरी फटाके – ६० ते ८०
चिटपुट-३०० रूपयास १० नग
भुईचक्र-१५० रूपयास २५ नग














