चिपळूण : पूरग्रस्त भगिनींना प्रेम, सन्मान आणि आशेचा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम सशक्त साथ अभियान परांडा तालुक्यात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत वूमन सपोर्ट वूमन या संस्थेमार्फत चिपळूणमधील महिलांनी तब्बल ६४० साड्या परांडा तालुक्यातील पिठापुरी, लाखी आणि ढगपिंपरी (जि. धाराशिव) या गावांमध्ये पाठवून एक अनोखे माहेरवाण पोहोचवले.
या अभियानाची संकल्पना वुमन सपोर्ट वुमन संस्थेच्या अध्यक्ष व संस्थापक डॉ. कांचन मदार यांनी मांडली होती. त्यानुसार चिपळूणमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. १० ऑक्टोबर रोजी, संस्थेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेडच्या रोहिणी मोरे आणि दिलाबर खान यांनी प्रत्यक्ष परांडा येथे जाऊन पूरग्रस्त भगिनींना साड्या वाटप केल्या. या उपक्रमात २४० साड्या वूमन सपोर्ट वूमन संस्थेतर्फे पिठापुरी आणि लाखी गावांमध्ये वाटण्यात आल्या, तर उर्वरित ४०० साड्यांपैकी १४० साड्या रामापूर आरोग्य केंद्र व ग्रामस्थ महिलांना, १३६ साड्या चिपळूण महिला मंचकडून, ५० साड्या इंडियन मेडिकल असोसिएशन वूमन डॉक्टर्स विंगकडून, ५० साड्या जिजाऊ ब्रिगेडकडून, ११ साड्या तालुका आरोग्य विभागाकडून, १० साड्या प्रयास ग्रुपकडून तर उर्वरित साड्या चिपळूणमधील महिलांकडून भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमात खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील यांचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 17/Oct/2025














