रत्नागिरी : शहरासहीत ग्रामीण भागातील जनता आता दिवाळी जवळ आल्याने घरांच्या डागडुजी आणि रंगरंगोटीच्या कामात गुंतली आहे. शेतकरी घरांबरोबरच गोठ्यांच्याही डागडुजी आणि शाकारणीकडे अधिक लक्ष देत आहे. सध्या या कामाला वेग आला आहे. मात्र, आता ग्रामीण भागात कामे करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने सुट्टीच्या दिवशी घरातील छोट्या-मोठ्या कामांचा उरक करण्याकडे कल वाढू लागला आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेतही लगबग वाढू लागली आहे. कपडे, फटाके, फराळाचे साहित्य घेण्यासाठी दुकांनामध्ये गर्दी होऊ लागली आहे. दुपारच्या वेळी बंद असणारी दुकाने आता दिवसभर उघडी राहत आहेत. यापुढे बाजारपेठेत गर्दी वाढत जाणार असून, काही व्यापाऱ्यांनीही दुकानात सेलच्या पाट्या लावल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 23/Oct/2024














