रत्नागिरी : जिल्ह्यात भाजप च्या वाट्याला कोणताच मतदारसंघ न आल्याने भाजप कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून नाराज होते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून उदय सामंत रिंगणात उतरल्याने भाजप चे जेष्ठ नेते बाळ माने हे उबाठा च्या मार्गावर आहेत. बाळ माने यांना मानणारा वर्ग देखील भाजप मध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी आज रत्नागिरीत येत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या तर काही पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक स्तरावर चर्चा केली.
यावेळी महाविजयाच्या दृष्टीने प्रचार कसा करावा, कोणते मुद्दे कशापद्धतीने पोहोचवावेत याबाबत मार्गदर्शन केले. महायुती सरकारच्या जनहितकारी योजना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. त्यानंतर सर्व उपस्थितांनी रत्नागिरीत महायुतीचाच भगवा ध्वज फडकावण्याचा निर्धार केला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा – महायुतीचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 23-10-2024














