Mandangad : मंडणगड तालुक्यात डेंगीचा धोका टळला

मंडणगड : तालुक्यातील बाणकोट गाव परिसरात डेंगीचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागास मिळाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात आली होती. संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार, सर्व नमुने एलिसा चाचणीत निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांनी दिली.

आरोग्य विभागाने मंडणगड तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या पाऊस थांबल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप अशी लक्षणे आढळणारे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी क्षेत्रात सतत फिरती करत असून, नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे तसेच, संशयित रुग्ण आढळल्यास त्यांचे रक्तनमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 18/Oct/2025