मंडणगड : डॉ. कलाम यांच्या शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक योगदानाचा उल्लेख करत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनामुळे ज्ञान वाढते, स्मरणशक्ती सुधारते, शब्दसंपदा वाढते, योग्य-अयोग्य याचा बोध होतो आणि चांगले संस्कार रूजतात, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे यांनी सांगितले.
मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी आणि पर्यवेक्षक शांताराम बैकर यांनी डॉ. कलाम यांच्या शिक्षण, संशोधन कार्यासह वाचनाचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 18/Oct/2025














