Ratnagiri : सोमेश्वर येथील विश्व मंगल गोशाळेमध्ये वसुबारस उत्साहात संपन्न

रत्नागिरी : सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी येथे विश्व मंगल गोशाळेमध्ये वसुबारस दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी गावातील सोमेश्वर मंदिराचे ट्रस्टी व सेक्रेटरी श्री मंदारजी सोहनी श्री मोहनजी सातव आणि हरचेरी बीटाचे डॉक्टर कळगे हजर होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते गोशाळेतील गाईंचे व वासरांचे पूजन करण्यात आले उपस्थित भगिनी वर्गाने ही या वेळेला गाई वासरांचे पूजन केले त्यानंतर उपस्थित त्यांच्या हस्ते गाई वासरांना गोग्रास भरवण्यात आले सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री राजेश आयरे यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले व परिचय करून दिला त्यानंतर देश हमे देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सिखे या प्रार्थनेने वसुबारस कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री. प्रकाश मुळ्ये यांनी गोशाळेतील कामकाजाचा आढावा घेतला. व कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला.

डॉक्टर कळगे यांनी देशी वंश गोवंश का सांभाळला पाहिजे गोशाळेची सद्यस्थितीत आवश्यकता काय आहे यामागील सायन्स त्याचप्रमाणे पर्यावरण संतुलन राखण्या मागची गाईंची आवश्यकता याविषयी सखोल माहिती दिली त्यानंतर श्री मोहनजी सातव रत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांनी गोमाते बद्दलचे आपले विचार कथन केले श्री राजीव जी लिमये यांनीही पुढे चर्चात्मक स्वरूपात गो महात्म्य या विषयाचे कार्यक्रम गोशाळेत आयोजित करावे अशा प्रकारची सूचना केली त्यानंतर, श्री इनामदार सर यांनी वसुबारस दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री पाटील सर यांनी श्रीम. शेंडे मॅडम यांच्या कडून आणलेली 15 हजाराची देणगी श्री. आयरे सरांकडे दिली. हाथखंबकर सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने ही गोशाळा आपण चालवत आहोत. असेच सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.

या निमित्ताने इयत्ता पाचवी ते दहावी अशी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती या चित्रकले स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक आर्या रुपेश शिंदे द्वितीय क्रमांक भक्ती सुधीर आर्वे तृतीय क्रमांक अवनी मिलिंद कोकरे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन सोमेश्वर शांतीपिठाच्या मार्फत करण्यात

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 18/Oct/2025