Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महायुतीचे आतापर्यंत 182 उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीची प्रतिक्षा

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी यंदा पहिल्यांदाच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी टफ फाईट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येत असून महायुतीने (Mahayuti) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.

महायुतीने आत्तापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, महाविकास आघाडीकडूनअद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात न आल्याने सर्वांना महाविकास आघाडीच्या यादीची प्रतिक्षा आहे. त्यातच, महायुती व महाविकास आघाडीशिवाय इतरही पक्षांनी व आघाड्यांनी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामध्ये, मनसेनं 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यापूर्वी, मनसेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे, आता महाविकास आघाडीतील (MVA) पक्षांच्या उमेदवारांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राज्यातील 288 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघांसाठी महायुतीकडून भाजपने 99, शिवसेनेनं 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

महायुतीमधील भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडमवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. तर, काही विद्यमान आमदारांचे तिकीटही कापण्यात आले. त्यानंतर, शिवसेना शिंदे गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच, काही ठिकाणी घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. आता, अजित पवारांनी 38 उमेदवारांची राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली असून आमदार सुनिल टिंगरेंना वेटिंगवर ठेवलं आहे. तर, विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापण्यात आलंय. त्यामुळे, महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून आत्तापर्यंत 182 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप 106 उमेदवारांच्या नावांची प्रतिक्षा आहे. तर, महाविकास आघाडीच्या 288 मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिक्षा महाराष्ट्राला आहे.

भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण

जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते

नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – श्रीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड

हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ

शिवसेना शिंदे गटाची पहिली 45 उमेदवारांची यादी

1) एकनाथ शिंदे- कोपरी पाचपाखाडी
2) मंजुळाताी गावित- साक्री (अनुसूचित जाती)
3) चंद्रकांत सोनावणे – चोपडा (अनुसूचित जाती)
4) जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील
5) किशोर पाटील- पाचोा
6) चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर
7) संजय गायकडवाड- बुलढाणा
8) संजय रायमुलकर- मेहकर (अनुसूचित जाती)
9) अभिजित अडसूळ- दर्यापूर (अनुसूचित जाती)
10) आशिष जैस्वाल- रामटेक
11) नरेंद्र भोंडेकर- भंडारा (अनुसूचित जाती)
12) संजय राठोड- दिग्रस
13) बालबाजी कल्याणकर- नांदेड उत्तर
14) संतोष बांगर- कळमनुरी
15) अर्जुन खोतकर- जालना
17) अब्दुल सत्तार- सिल्लोड
18) प्रदीप जैस्वाल- छत्रपती संभाजीनगर मध्य
19) संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अनुसूचित जाती)
20) विलास भुमरे -पैठण
21) रमेश बोरनारे- वैजापूर
22) सुहास कांदे- नांदगाव
23) दादाजी भुसे- मालेगाव बाह्य
24) प्रताप सरनाईक ओवळा माजीवडा
25) प्रकाश सुर्वे- मागाठाणे
26) मनिषा वायकर- जोगेश्वरी (पूर्व)
27) दिलीप लांडे- चांदिवली
28) मंगेश कुडाळकर- कुर्ला (अनुसूचित जाती)
29) सदा सरवणकर- माहीम
30) यामिनी जाधव – भायखळा
31) महेंद्र थोरवे- कर्जत
32) महेंद्र दळवी- अलिबाग
33) भरतशेठ गोगावले- महाड
34) ज्ञानराज चौगुले- उमरगा (अनुसूचित जाती)
35) तानाजी सांवंत- परंडा
36) शहाजीबापू पाटील- सांगोला
37) महेश शिंदे- कोरेगाव
38) शंभूराज देसाई-पाटण
39) योगेश कदम- दापोली
40) उदय सामंत- रत्नागिरी
41) किराण सामंत- राजापूर
42) दीपक केसरकर- सावंतवाडी
43) प्रकाश आबिटकर- राधआनगरी
44) चंद्रदीप नरके- करवीर
45) सुहास बाबर- खानापूर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी

1.बारामती- अजित पवार
2. येवला- छगन भुजबळ
3. आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
4. कागल- हसन मुश्रीफ
5. परळी- धनंजय मुंडे
6. दिंडोरी- नरहरी झिरवाळ
7. अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
8. श्रीवर्धन- आदिती तटकरे
9. अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
10. उदगीर- संजय बनसोडे
11. अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
12. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
13. वाई- मकरंद पाटील
14. सिन्नर- माणिकराव कोकाटे
15. खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
16. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
17. इंदापूर- दत्तात्रय भरणे
18. अहमदपूर- बाबासाहेब पाटील
19. शहापूर- दौलत दरोडा
20. पिंपरी- अण्णा बनसोडे
21. कळवण- नितीन पवार
22. कोपरगाव- आशुतोष काळे
23. अकोले – किरण लहामटे
24. वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
25. चिपळूण- शेखर निकम
26. मावळ- सुनील शेळके
27. जुन्नर- अतुल बेनके
28. मोहोळ- यशवंत माने
29. हडपसर- चेतन तुपे
30. देवळाली- सरोज आहिरे
31. चंदगड – राजेश पाटील
32. इगतुरी- हिरामण खोसकर
33. तुमसर- राजे कारमोरे
34. पुसद -इंद्रनील नाईक
35. अमरावती शहर- सुलभा खोडके
36. नवापूर- भरत गावित
37. पाथरी- निर्णला विटेकर
38. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 23-10-2024