Ratnagiri, Happy Diwali 2025: दिवाळी सणाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण!

रत्नागिरी : Happy Diwali 2025: हिंदू धर्मामध्ये दीपोत्सवास अतिशय महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून ते बलिप्रतिपदेपर्यंत (पाडवा) दिवाळी सण उत्सवात साजरा केला जातो. दिवाळी सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, दु:खावर आनंदाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानलो जातो. या सणामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते. प्रत्येक घरासमोर रांगोळी, दिव्यांची सुंदर सजावट पाहायला मिळते.

दिवाळी सणास सुरूवात झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. सणासुदीच्या काळात फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली असली, तरी नैसर्गिक फुलांचे दर आकाशाला भिडले आहेत. यंदा फुलांचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारात फुलांची आवक जवळपास 50 टक्क्यांनी घटली आहे. कमी आवक आणि वाढलेल्या मागणीमुळे फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा पर्याय स्वीकारला असून घरात, कार्यालयात, दुकानात मोठ्या प्रमाणात कृत्रिम फुलांचा दरवळ दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 20-10-2025