राजापुरात गोवा बनावटीचा मद्यसाठा हस्तगत; ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

लांजा : राज्य उत्पादन शुल्काच्या महाराष्ट्र मुंबई भरारी पथकाने ८४ लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाच्या मुंबई पथकाने ही कारवाई केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा बनवटीचा सुमारे ७० लाख रुपयांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

आयशर टेम्पोतून गोवा बनवटीच्या दारूची वाहतूक केली जात होती. टेम्पोमध्ये 1058 बॉक्स आढळले आहेत. यात आयशर टेम्पो आणि व्हिस्कीचा एकूण सुमारे ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 23/Oct/2024