रत्नागिरी : सोमवारी, दि.२० ऑक्टोबर रोजी दीपावलीचा पहिला दिवस असला तरी स्वरूपानंद पतसंस्थेचे सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत. सभासद ग्राहकांना दीपावलीच्या शुभेच्छा प्रत्यक्ष देण्यासाठी तसेच दसरा-दिवाळी ठेव योजनेचा अखेरचा दिवस असल्याने ठेवीदारांना गुंतवणुकीची संधी साधता यावी यासाठी पतसंस्थेची सर्व कार्यालये सुरू राहतील.
दसरा-दिवाळी ठेव योजनेला गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. संस्थेच्या एकूण ठेवी ३८८ कोटी रुपयांच्या झाल्या असून दसरा दिवाळी ठेव योजनेमध्ये ८ कोटींच्या ठेवी नव्याने जमा झाल्या आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर स्वरूपानंद पतसंस्थेच्या अर्थकुटुंबासाठी पतसंस्थेची आर्थिक घोडदौड विशद करताना मनापासून आनंद होत आहे. २७६ कोटींची कर्ज, ३८८ कोटींच्या ठेवी, १७० कोटींच्या बँक गुंतवणूका, २८.२४ टक्के भांडवलपर्याप्ततेचे प्रमाण आणि ५४ कोटींचा स्वनिधी, सलग ३३ व्या वर्षी प्राप्त झालेला ‘अ’ ऑडिट वर्ग, ९९.६९ टक्के इतकी सप्टेंबर २०२५ अखेरची वसुली अशा उत्तम आर्थिक स्थितीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातील अर्थकारण सातत्यपूर्ण मार्गक्रमण करीत आहे.
या पार्श्वभूमीवर सभासदांना, ग्राहकांना दीपावलीच्या शुभकामना देताना आनंद होत आहे असे ॲड. पटवर्धन म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 20-10-2025














