Ratnagiri ST BUS : दिवाळीनिमित्त १६ ते ५ नोव्हेंबरपर्यंत जादा गाड्याचे नियोजन

रत्नागिरी : जिल्ह्यात नोकरी-व्यवसायानिमित्त असलेल्या प्रवाशांसाठी दिवाळीनिमित्त २५० हून अधिक जादा एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई, मराठवाड्याच्या दिशेने रवाना होत आहेत. ५ नोव्हेंबरपर्यंत जादा व आरक्षित बसेस सोडण्यात येणार असून, दिवाळीत ‘लालपरी’ हाऊसफुल्ल आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात असलेले नागरिक दिवाळीनिमित्त हमखास आपल्या गावी जात असतात. तसेच काहीजण पर्यटन, तर काहीजण मामाच्या गावाला जात असतात. प्रवासाठी नागरिक ‘लालपरी’लाच पसंती देत असतात. दिवाळीनिमित्त नागरिकांचा प्रवास चांगला, सुखकर व्हावा, यासाठी रत्नागिरी विभागातर्फे आरक्षण बसेस, जादा बसेसचे नियोजन केले आहे. कित्येक गाड्या आरक्षित झालेल्या आहेत, तर काही ठिकाणी जादा बसेसचे नियोजन केले आहे. १६ ऑक्टोबरपासून रत्नागिरी आगारासह विविध आगारातून बसेस पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठावाड्यांच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. तब्बल पाच नोव्हेंबरपर्यंत या फेऱ्या चालणार असल्याचे एसटी विभागातर्फे सांगण्यात आले. या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सवलतीचा लाभ घेतला आहे. दिवाळनिमित्त ६५ वर्षांपुढील ज्येष्ठांना, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे, तर ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना तिकिटात शंभर टक्के सवलत देण्यात आली असून दिवाळीत या सवलतीचा लाभघेतला आहे.

आगारनिहाय फेरीचा मार्ग
दापोली : महाडमार्गे छत्रपती संभाजीनगर, चिपळूण तुळजापूर, बारामती, गुहागर : नृसिंहवाडी, देवरुख कोकरूड स्वारगेट, अक्कलकोट, रत्नागिरी : पंढरपूर, लांजा : कोल्हापूर- स्वारगेट, राजापूर: पाचल अणुस्कुरा- तुळजापूर, राजापूर-मिरज, मंडणगड-दापोलीपासून पुणे, कोंडगावपासून नालासोपारा, भोळवलीपासून बोरीवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 20-Oct-25