दापोली : जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला असून, दापोली येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. लक्ष्मीकांत पांडुरंग पाटील यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
एम. ए., बी. एड., एम.फिल. पदवीधारक असलेले प्रा. पाटील जून १९९७ पासून दापोलीतील वराडकर-बेलोसे वाणिज्य आणि शांतीलाल जैन सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. २००४-०५ मध्ये आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभाग सुरू मोलाचा वाटा होता.
या विभागामार्फत ‘उड्डाण’ आणि ‘युवा महोत्सव’ हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. ते महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र विचार मंचाचे आजीवन सदस्य आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 20-Oct-25














