Guhagar : ८ नोव्हेंबरपासून राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : कै. सौ. नीला व कै. श्री. मधुकाका परचुरे यांच्या स्मृतिप्रीतर्थ परचुरे परिवार व कॅरमप्रेमी मित्र मंडळ गुहागर आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने या वर्षातील १० वी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०२५ कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह (भंडारी भवन) गुहागर येथे दिनांक ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.

ही स्पर्धा पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांत होणार असून विजेत्यांना एक लाखाची पारितोकषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेची पुरुष खुली व महिला एकेरीची प्रवेशिका रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते यांचाकडे दिनांक ३० ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह द्यावी. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. प्रवेशिका देताना खेळाडूने आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी व जन्म तारीख देणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचा लोगो असलेला सफेद टी-शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धा आयोजक प्रदीप परचुरे व कॅरमप्रेमी मित्र मंडळ गुहागर, जिल्हा कॅरम असो. चे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, खजिनदार नितीन लिमये, सेक्रेटरी मिलिंद साप्ते, सल्लागार सूचय रेडीज यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 20-Oct-25