Seva Pandharwada : राजापुरात सेवा पंधरवडा उत्साहात

राजापूर : तहसील कार्यालय पुरवठा विभाग व रास्त धान्य दुकानदार संघटना राजापूर यांच्या वतीने नुकताच सेवा पंधरवडा नुकताच साजरा करण्यात आला. शासनाच्या अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांस रेशनिंग धान्य वितरणाासह शासनाकडून मिळणाऱ्या सेवापासून कोणीही वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याचा निर्धार करण्यात आला. रास्त दाराचे शासनमान्य धान्य दुकान चालविणाऱ्या महिला बचतगटांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसीलदार विकास गंबरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रास्त धान्य दुकान चालविणाऱ्या आठ महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला, तर दुकानदारांना महाराष्ट्र शासन ओळख पत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी तालुका रास्त दर धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अॅड. महेश नकाशे, पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती गुरव, पुरवठा निरीक्षक नीलेश लाड, महसूल अधिकारी दीपा निटुरे, तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष नरेश शेलार, सचिव दीपक जाधव, चंद्रकांत जड्यार, महेंद्र मावंलकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 20-Oct-25