दापोली : दापोली-खेड महामार्गावरील काळकाईकोंड परिसरात पाण्याच्या टाकीजवळील रस्त्यावर पडलेल्या खोल खड्डयांमुळे वाहनचालक व प्रवाशांना होत असलेल्या त्रासातून अखेर दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी (ता. १८) खड्डे भरून तातडीने दुरुस्ती केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली होती. खोल खड्यांमुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता तर चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर होणे आणि वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना घडत होत्या.
स्थानिक नागरिक व प्रवाशांनी वारंवार तक्रारी करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने काम हाती घेऊन खड्डे बुजवले. यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत झाली असून, प्रवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 20-Oct-25














