Chiplun : चिपळुणात महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण

चिपळूण : भाजपच्या चिपळूण शहर मंडलतर्फे शहरातील नऊ प्रभागांत महिला, युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण घेण्यात आले. शिबिराचा लाभ २७७ महिलांनी घेतला. शिबिर शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

चिपळूण शहरातील युवती व महिला यांना घरबसल्या मोकळ्या वेळेत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा तसेच घरातील तिचा सन्मान वाढावा, या हेतूने हे प्रशिक्षण आयोजित कले होते. शिबिरात मोत्याचे दागिने, आकाशकंदील, विविध प्रकारच्या हस्तकला दाखवण्यात आल्या. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून जास्तीचा नफा मिळतो, हेही दाखवण्यात आले. प्रशिक्षिका उमा म्हडदळकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 20-Oct-25