साडवली : रत्नागिरी-देवरूख रस्त्यावरील निवेबुद्रुक येथील गटार पूर्ण होऊन तीन वर्षे झाली आहेत; मात्र हे गटार उघडे असल्याने अपघाताची शक्यता आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेबुद्रुक ग्रामस्थांनी निवेदन दिले. आठ दिवसांत संबंधित ठेकेदार वेल्हाळ यांना बोलावून ग्रामस्थांसमवेत कामाची पाहणी करून लगेच दुरुस्ती करून देतो, असा शब्द उपअभियंता वैभव जाधव यांनी ग्रामस्थांना दिला. पाटगाव घाटीचे कामही दिवाळीनंतर लगेच सुरू केले जाईल. नागोबा मंदिराच्या पुढे खचलेल्या मोरीचे काम व पडलेला खड्डा बुजवण्याचे आश्वासन जाधव यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 20-Oct-25














