Mandangad : मंडणगडात दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध, तपासणी शिबिर

मंडणगड : तालुक्यातील शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचे तपासणी शिबिर येथील ग्रामीण रुग्णालयात नुकतेच पार पडले. या शिबिराचे आयोजन जिल्हा विधी प्राधिकरण, समग्र शिक्षा शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद व पंचायत समिती मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

यावेळी मंडणगड न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश व न्यायादंडाधिकारी अमृता जोशी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, अॅड. मिलिंद लोखंडे, अॅड. घागरूम, डॉ. प्रभाकर भावठाणकर, शिक्षक बोरले, शिक्षक वैभव भोसले, सुनील ऐनकर आदी उपस्थित होते. शिबारास ७० दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यापैकी २१ विद्यार्थी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:45 PM 20-Oct-25