कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र न लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

खेड : राज्य शासनाने सर्व सरकारी कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र धारण करणे अनिवार्य केले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा शासनाने दिला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात सर्व शासकीय कार्यालयांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. अनेकवेळा सूचना देऊनही काही कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र लावत नाहीत. त्यामुळे नागरिकांना संबंधितांची ओळख पटत नाही आणि गैरसोयी निर्माण होतात.

शासनाने याकडे गांभीर्याने पाहून, ओळखपत्र लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच, कार्यालय प्रमुखांवर या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी ओळखपत्र न लावताना आढळतात. अशा प्रकारचे दुर्लक्ष टाळण्यासाठी आता प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयीन वेळेत ओळखपत्र धारण करणे बंधनकारक आहे.

ओळखपत्र लावण्यामागील उद्देश :
शासनाने नमूद केले आहे की, ओळखपत्र लावल्यानं नागरिकांन कर्मचाऱ्यांची ओळख पटते, पारदर्शकता राखली जाते आणि कार्यालयीन शिस्त पाळली जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:53 PM 20-Oct-25