राजापूर : जिल्हा परिषद आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजापूर तालुक्यातील सहाही जिल्हा परिषद गटांत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. या सहाही जि. प. गटांत अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा पहावयास मिळणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणात बडदहसोड आणि धोपेश्वर हे दोन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण म्हणून जुवाठी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि तळवडे, कातळी, साखरी नाटे असे तीन गट सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाले आहेत. यावेळी राजापूर तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गाला आरक्षणामध्ये संधी मिळालेली नाही.
राजापूर तालुक्यात वडदहसोळ, तळवडे, जुवाटी, धोपेश्वर, साखरीनाटे, कातळी असे जि प गट असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्रभाग रचनेत जरी एकही गट तालुक्यात वाढला नसला, तरी झालेल्या रचनेत सर्व गट नवीन नावाने अस्तित्वात आले आहेत. जुन्या नावाने एकही गट आता ओळखला जाणार नाही.
वडदहसोळ जि प गट पूर्वी ओणी या नावाने ओळखला जात होता. या जि प गटाला यापूर्वी जिप अध्यक्ष पदासह बांधकाम, शिक्षण अशी सभापतीपदे लाभली आहेत. आता वडदहसोळ या नवीन नावाने ओळख झालेल्या या गटात मोठी चुरस होणार असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण म्हणून हा गट अनारक्षित राहिल्याने येथे संभाव्य इच्छुकांची मोठी मंदियाळी पहावयास मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत.
राजापूर तालुक्यातील सहा जिप गटामध्ये वडदहसोळ आणि धोपेश्वर हे दोन गट सर्वसाधारण, जुवाठी हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि तळवडे, कातळी आणि साखरीनाटे हे तीन गट सर्वसाधारण महिला असे आरक्षित झाले आहेत. मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गाला राजापूरमध्ये स्थान मिळालेले नाही. सर्वच्या सर्व सहाही गटात मोठी चुरस आहे. अनेकजण इच्छुक आहेत. अंतिम बाजी कोण मारणार… उमेदवारी कुणाला मिळणार.. आणि मतदार विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार ते निवडणूक निकालाअंती जाहीर होणार असल्याने हळूहळू तालुक्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
मात्र केव्हा एकदा निवडणूक जाहीर होणार त्याचीच प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे. इच्छुकांनी मार्चेबांधणी सुरू केली असून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी दिवाळीसणाचा उपयोग करुन घेतला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:03 PM 20-Oct-25














