Mandangad : मंडणगड आगाराने नव्या गाड्या सोईच्या मार्गावर सोडण्याची मागणी

मंडणगड : यंदाच्या पावासात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंडणगड आगाराच्या ताफ्यात आधी पाच व नंतर दोन अशा एकूण सात नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. अजूनही तीन नवीन गाड्यांची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात दाखल झालेल्या सर्वच्या सर्व नवीन गाड्या तालुक्यातील प्रवासी व महामंडळाच्या ग्राहकांच्या मुंबई, नालासोपारा व मुंबई उपनगराच्या मार्गावर सोडण्यात याव्यात, अशी मागणी येथील प्रवशांमधून केली जात आहे.

मंडणगड आगाराच्या ताफ्यातील सेवेत नव्या सात गाड्या दाखल झालेल्या असल्या तरी या गाड्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील लांब पल्ल्याच्या शहराच्या मार्गावर सोडण्यात येत आहेत. या मार्गावर प्रवशांपेक्षा आगारात कार्यरत कर्मचाऱ्यांची सोय व गैरसोय लक्षात घेऊन सोडण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आगार व्यवस्थानाने याची दखल न घेतल्यास प्रवाशांना नाईलाजाने आंदोलना करावे लागेल, असा इशारा अनेक प्रवासी मित्र संघटनानी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:34 PM 20-Oct-25