साडवली : संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय शिवणे- बुरंबीच्या १७ वर्षे वयोगट मुलगे खो-खो संघाने डेरवण येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावत विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालय प्रथम आले आहे. तसेच १७ वर्षांखालील मुलगे खो खो संघामध्ये आशिष बालदे, अथर्व गराटे, पार्थ बुदर या खेळाडूंची उस्मानाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महावीर साठे, प्रशिक्षक सहायक शिक्षक सुहास पाब्ये, सुरेंद्र कुळ्ये, सुरज जाधव, सुनील पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अशोक सरफरे, उपाध्यक्ष राजाराम गर्दे, शांताराम भुरवणे, सरचिरणीस दिलीप मोरे, सचिव शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, संचालक दिनेश जाधव, सचिन मोहिते, ललित लोटणकर, मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, पर्यवेक्षक महावीर साठे आणि शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 23/Oct/2024














