Crime Case : विषारी द्रव्य पाजून उत्तर प्रदेशातील तरुणाचा रत्नागिरीत खून; पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : उत्तरप्रदेश येथून कामानिमित्त रत्नागिरी दाखल झालेल्या पत्नीने पतीला विषारी पदार्थ पाजून मारल्याची तक्रार झिरो नंबरने ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली असून संशयित पत्नीसह अन्य दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील संशयितांमध्ये एका महिलेसह मनीराम कल्लराम (४५), मनीराम यांची पत्नी (नाव माहित नाही. ४०, रा. बरसोला कला, तिकोनियाँ. जिल्हा खिरी, राज्य उत्तर प्रदेश) अशी तीन संशयितांची नावे आहेत. ही घटना २० जून रोजी घडली होती.

फिर्यादी श्रीराम श्रीपाल निवास (४५, रा. बरसोला कला, तिकोनियाँ, जिल्हा खिरी, राज्य-उत्तरप्रदेश) यांचा मुलगा मयत भानुप्रताप रामनिवास याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सून फिर्यादी श्रीराम यांचा मुलगा भानूप्रताप याच्याशी नेहमी भांडत असे. दरम्यान, संशयित मनीराम कल्लामच्या सांगण्यावरुन फिर्यादीचा मुलगा भानुप्रताप व त्याची पत्नी असे दोघेही कामासाठी रत्नागिरी आले होते. त्या नंतर फिर्यादी-श्रीराम निवास यांनी संशयित मनीराम याला वारंवार फोन करुन मुलाची विचारफूस करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तसेच सुनेने पतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

दरम्यान, २० जून २०२५ ला संशयित मनिराम याने फिर्यादी श्रीराम निवास यांना फोन करुन कळविले की, त्यांचा मुलगा आजारपणामुळे मरण पावला. श्रीराम श्रीपाल निवास यांच्या तक्रारीनुसार सुनेने त्यांचा मुलगा भानुप्रताप रामनिवास याला विषारी पदार्थ पाजून मारल्याचा संशय व्यक्त करुन तशी तक्रार २३ जून २०२५ ला तिकोनियाँ पोलिस ठाणे, जिल्हा खिरी, राज्य उत्तर प्रदेश येथे दिली होती.

या तक्रारीवरुन तेथील पोलिसांनी संशयितांविरुद्ध तिकोनियाँ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीचे झिरो नंबरने कागदपत्र दि. १८ ऑक्टोबरला ग्रामीण पोलिस ठाण्यात प्राप्त झाली. या नुसार ग्रामीण पोलिसांनी संशयित उत्तर प्रदेशमधील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 21-Oct-25