Dapoli : देहेण येथे कर्नाटक पासिंगचा डंपर वाळू वाहतूक ग्रामस्थांनी पकडला

दापोली : तालुक्यातील देहेण येथे कर्नाटक पासिंगचा वाळूने भरलेला एक डम्पर येथील ग्रामस्थांनी अडवून दापोली महसूल विभागाच्या ताब्यात दिला आहे. या कारवाईत महसूल विभागाने पंचनामा करून हा वाळूने भरलेला डम्पर वाळूसह दापोली पोलिस ठाण्याच्या आवारात आणून ठेवण्यात येणार आहे, असे सांगितले.

याबाबत दापोली तालुक्यातील देहेण येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक पासिंगचा एक वाळूची वाहतूक करणारा डम्पर तेथील ग्रामस्थांनी अडवला. या घटनेची माहिती पत्रकाराना देण्यात आल्यावर पत्रकारांनी सदर माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांना दिल्यावर त्यांनी मंडल अधिकारी अंभोरे यांना देहेण येथे पाठविले. त्यांनी पंचनामा करून डम्पर ताब्यात घेतला. या संदर्भात दिवाळीची सुट्टी संपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार बोंबे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 21-Oct-25