मेष – आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल.
वृषभ – आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.
मिथुन – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल.
कर्क – आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल.
सिंह – आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल.
कन्या – आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्या संबंधात प्रेमवृद्धी होईल.
तूळ – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल.
धनु – कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील.
मकर – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल.
कुंभ – आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल.
मीन – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 21-10-2025














