Dapoli : ‘स्वच्छ दापोली, सुंदर दापोली’चा कापडी पिशवी वाटपातून पर्यावरणपूरक संदेश

दापोली : उद्धव ठाकरे गटाचे दापोली शहराध्यक्ष व दापोली नगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक संदीप चव्हाण यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ दापोली, सुंदर दापोली’ या संकल्पनेखाली पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. सणासुदीच्या काळात प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण यावे यासाठी चव्हाण यांनी स्वःपुढाकाराने नागरिकांना कापडी पिशव्या वाटप करून प्लास्टिकमुक्त दापोलीचे एकप्रकारे आवाहन केले.

दापोली नगरपंचायतीवर सत्ता नसतानाही चव्हाण यांनी समाजहिताचा उपक्रम राबवल्याने त्यांच्या या प्रयत्नांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. दिवाळीच्या शुभ काळात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन त्यांनी लोकांमध्ये सकारात्मक जनजागृती घडवून आणली आहे. या मोहिमेमुळे ‘स्वच्छ दापोली, सुंदर दापोली’ हा नारा आता फक्त घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरला आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम दापोलीतील इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 21-Oct-25