Ratnagiri : ‘स्वरसंध्या’तर्फे दिवाळी पाडवा मैफलीचे आयोजन

रत्नागिरी : दिवाळी पाडवा पहाट हा सुरेल गायनाचा कार्यक्रम रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे स्वरसंध्या परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या मैफलीत अर्णव सरपोतदार, वैष्णवी कोपरकर, रुद्राणी मुळे, सावनी सरपोतदार, स्वराली सुर्वे हे बाल कलाकार आहेत. सूत्रसंचालन सायली मुळे-दामले तबला केदार लिंगायत, हार्मोनियम श्रीरंग जोगळेकर, ढोलकीवर साथसंगत कैलास दामले संगीत संयोजन संध्या सुर्वे करणार आहेत. ही मैफल २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता रूम न २०६ पहिला मजला जिल्हा न्यायालय नवीन इमारत येथे आयोजित केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 21-Oct-25