चिपळूण : शहरातील बहादूरशेख वाशिष्ठी पुलाजवळ चिपळूण नगरपरिषदेची जॅकवेल आहे. याठिकाणी कच्चा बंधारा बांधण्यात आला होता. तो वाहून गेल्यामुळे चिपळूण उपनगर धामणवणे गावांमध्ये नळाला कमी प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
तसेच त्याठिकाणी चिखल साचला आहे. सदरच्या माळेवाडी जॅकवेलचा चिखल काढून त्याठिकाणी कच्चा बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी चिपळूण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. धामणवणे येथील पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्याने यामध्ये नगर परिषदेने तातडीने लक्ष घालावे. नाहीतर नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही मुकादम यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 21-Oct-25














