चिपळूण : एसटीचा आपत्कालीन दरवाजा निकामी झाल्याने तो अचानक उघडून दरवाजातून महिला प्रवासी बसबाहेर फेकली गेली. या घटनेत संबंधित महिला प्रवासी जखमी झाली. याबाबत सावर्डे पोलिस स्थानकात नोंद असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रियांका विनोद कुंभार असे जखमी महिलेचे नाव आहे.
कुंभार या गुहागर – रत्नागिरी बसने प्रवास करीत असता दहिवली ते सावर्डेदरम्यान रविवारी सकाळी दहिवली बुद्रुक शिवडेवाडी येथे ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख रूपेश घाग सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले व सहकार्य केले. दैव बलवत्तर म्हणूनच कुंभार वाचल्या. जखमी कुंभार यांच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची फिर्याद सविता सुभाष करंजेकर यांनी दिली. त्यानुसार गुहागर आगारातील चालक नितीन भाऊराव सावळे वाहक चांद नजीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 21-Oct-25














