रत्नागिरी : पोलिस दलातील पोलिस अधिकारी व अंमलदारानी कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ (ता. २१) सकाळी आठ वाजता पोलिस मुख्यालय येथे शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली देवून पोलिस स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 21-Oct-25














