UBT : पक्ष संघटन बळकट करण्यावर भर द्या : रवींद्र डोळस

चिपळूण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर द्यावा. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून नागरिकांशी संपर्क वाढवायला हवा. तसेच राजकीय घडामोडीविषयी सावध राहा असे निर्देश जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांनी ठाकरे सेनेच्या बैठकीत दिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, महिला आघाडी आणि युवासेनेची चिपळूण कार्यकारिणी बैठक प्राथमिक शिक्षक पतपेढी हॉल येथे पार पडली. या बैठकीत समन्वयक डोळस यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणांगणात शिवसैनिक तयार आहेत. जनतेचा संपर्क, एकजुटीचा संकल्प आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हा मंत्र घेऊन कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनीही एकजुटीचा नारा देत सज्ज असल्याचे सांगितले. या बैठकीस जिल्हा समन्वयक मंगेश शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख भैय्या कदम, महिला उपजिल्हा संघटक धनश्री शिंदे, रूमा देवळेकर, सुधीर शिंदे, राजू देवळेकर, मोहन मिरगल, मानसी भोसले, श्रद्धा घाडगे आदींसह सर्व उपतालुकाप्रमुख, उपशहर प्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख आणि विविध स्तरांवरील पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 21-Oct-25