संगमेश्वर : जिल्हा रुग्णालयात रक्त साठ्याची कमतरता जाणवत असल्यामुळे जय सांबा युवा प्रतिष्ठान, पाटगाव यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात २२ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. त्या गरजू रुग्णांना दिल्या जाणार आहेत. हे शिबिर जिल्हा परिषद केंद्र शाळा, पाटगाव येथे झाले. यावेळी नेहा रवींद्र माने, सरपंच ज्योती गोपाळ, पोलिसपाटील राजाराम खेडेकर, श्री. तांबे आदींनी रोपांचे वाटप केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 21-Oct-25














