रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस २२ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रकानुसार संपूर्ण आठवडाभर चालवली जाणार आहे. यापूर्वी पावसाळ्यात ही रेल्वे फक्त आठवड्यातील तीन दिवस धावत होती. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेन फक्त तीन दिवस धावत होती.
शुक्रवार वगळता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशीही ही गाडी चालवली जाणार आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून सकाळी ५.२५ वाजता रवाना होते आणि त्या दिवशी दुपारी १.१० वाजता मडगाव, गोवा येथे पोहोचते. तर परतीचा प्रवास मडगावहून दुपारी २.४० वाजता सुरू होतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 21-Oct-25














