मंडणगड : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेंतर्गत शहरातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विस्तार विभाग यांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून व राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून ‘आपला परिसर, स्वच्छ परिसर’ या विषयावर आधारीत भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्षा संपदा पारकर, कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, सहकार्यवाह विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष रवींद्रकुमार मिश्रा, संचालक आदेश मर्चेंडे, वैभव कोकाटे, प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. संगीता घाडगे, प्रा. शरीफ काझी, डॉ. महेश कुलकर्णी उपस्थित होते.
स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, तर प्रास्ताविक डॉ. संगीता घाडगे यांनी केले. ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेंतर्गत महाविद्यालयामध्ये बस स्थानक स्वच्छता, भित्तिपत्रक प्रकाशन, निबंध स्पर्धा, एन. एन. एस. स्थापना दिवसानिमित्त डॉ. व्ही. एम. पातंगे यांचे ऑनलाईन व्याख्यान, महाविद्यालय परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, तसेच स्वच्छतेची शपथ हे सर्व उपक्रम राबवून ‘स्वच्छता पंधरवडा’ मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 21-Oct-25














