आदित्य ठाकरेंचा दापोलीत २८ ऑक्टोबरला दौरा

दापोली : दापोली खेड विधानसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेकडून संजय कदम यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. २४ ऑक्टोबरला निवडक कार्यकर्त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर २८ ऑक्टोबरला दापोली शहरात आझाद मैदान येथे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरीचे आयोजन करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही, मात्र उमेदवारी अर्ज निवडक कार्यकत्यांसह दाखल करण्यात येणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार असून, या पक्षातर्फे माजी आमदार व जिल्हाप्रमुख संजय कदम यांचे एकमेव नाव आहे. कदम यांनीही तयारी केलेली आहे. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे खेड येथून दापोलीत येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या वेळी शिवसेना नेते आमदार अनिल परब, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, राजापूरचे आमदार राजन साळवी आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पक्षफुटीनंतर माजी आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर गेली दोन वर्षे दापोली, मंडणगड व खेडमध्ये त्यांनी संपर्क वाढवलेला आहे. त्यांच्याकडे उत्तर रत्नागिरीचा जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारीही दिली गेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 23/Oct/2024