रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई येथील प्रौढ सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आला. संशयित प्रौढांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश धरमू शिंदे (वय ५०) असे संशयित प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, तालुक्यातील मालगुंड येथील समुद्रकिनारी मद्यपान करणाऱ्या प्रौढांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हरिश्चंद्र मयेकर (वय ४४) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नीलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 21-Oct-25














