रत्नागिरी : दुचाकीवरून तीन जण प्रवास करत असताना तरुणींच्या दुचाकीला बसणी येथील रस्त्यावर अपघात झाला. तरुणीच्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ओमकार राजाराम शिंदे (वय २२, रा. लेप्रेसी कॉलनी उद्यमनगर-रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी तालुक्यातील बसणी रस्त्यावर घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:08 PM 21-Oct-25














