गणपतीपुळे : रत्नागिरी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प २ अंतर्गत मालगुंड बीट १ च्या वतीने पोषण पंधरवडा कार्यक्रम मालगुंड ग्रामपंचायतीत सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.अंगणवाडी सेविका ममता नेवरेकर यांनी स्वागत गीत गायले. तसेच मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक परशुराम निवेंडकर यांनी कॅन्सर व आयोडीनयुक्त मीठ याविषयी, तर मालगुंड ग्रामपंचायत सदस्या शुभदा मुळ्ये यांनी बालकांचा विकास व आहार आणि त्यांच्यावर केले जाणारे संस्कार याबाबत मार्गदर्शन केले. पोषण पंधरवड्यानिमित्त महिलांनी पौष्टीक व सकस विविध पाककला पदार्थांचे प्रदर्शन केले होते. यामधून एक ते चार नंबर काढण्यात आले. त्यातील प्रथम क्रमांक कस्तुरी केळकर, द्वितीय क्रमांक धनश्री धावडे, तृतीय क्रमांक हर्षदा खापणे, उत्तेजनार्थ क्रमांक शमिका शेखर घवाळी हिने पटकावले.
या कार्यक्रमास वरची निवेंडीच्या सरपंच रवीना कदम, गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्कये, भगवतीनगरच्या सरपंच श्रेया राजवाडकर, मालगुंडच्या उपसरपंच स्मिता दुर्गवळी, पोलीस पाटील निधी मांडवकर, आशा सेविका साधना पवार, सुजाता मांडवकर, सौ. मेन्ये, मालगुंड एकच्या बीट प्रमुख धनश्री वाचिम आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक मालगुंड बीट १च्या मुख्य सेविका संपदा भागवत, सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका ज्योती पवार, तर आभारप्रदर्शन अंगणवाडी सेविका दीपाली केळकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:45 PM 21-Oct-25














