रत्नागिरी : मोबाईलचा वापर करून आपल्या करिअरला योग्य दिशा देण्याचे काम आपण करू शकतो, असे सांगून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबतही महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग व आयक्यूएसी यांच्या सहकार्याने नुकताच विद्यार्थी संवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत शितोळे बोलत होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर हा कशासाठी केला पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. करिअर कट्टा उपक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचीही यावेळी शितोळे यांनी माहिती दिली.त्यानंतर महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला करिअर कट्टा रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य वसुंधरा जाधव, आयक्यूएसी समन्वयक राखी साळगावकर आणि महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्रा. हर्षदा लिंगायत उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:50 PM 21-Oct-25














