Dapoli : हर्णेतील व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

दापोली : उसने पैसे घेतलेल्या व्यक्तीच्या पाजपंढरी येथील घरी जाऊन पैशाची मागणी केल्याच्या रागातून हर्णै-जुनी ब्राह्मणआळी येथील व्यापारी दीपक अशोक खेडेकर (वय ५०) यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार रविवारी सकाळी हर्णे येथे घडला. याप्रकरणी भरत चुनेकर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाजपंढरी कस्टम चौकी दापोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याने शिवीगाळ ही केल्याचे दीपक खेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:23 PM 21-Oct-25