चिपळूण : राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार जनजागृती कार्यक्रम सप्ताह दलवाई हायस्कूल येथे झाली. या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. दलवाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोडीनचे एक महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली. यावेळी गीत गायन सादर केले.
या कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक भोई, कोल्हापूर प्रशिक्षण केंद्राचे पर्यवेक्षक जगन्नाथ खोत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, दलवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहित जाधव, उपमुख्याध्यापक समिधा डांगे, मोहन जाधव, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 23/Oct/2024