चिपळूण : मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मार्कंडी येथील संभाजी चौक मित्रमंडळाने मदतीचा हात दिला आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे ५१ हजार रुपयांचा धनादेश मंडळातर्फे सुपूर्द करण्यात आला.गेल्या महिन्यात मराठवाडा व विदर्भावर निसर्गाने अवकृपा केली व अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले. चिपळूणनेही २०२१ मध्ये महापुराचा अनुभव घेतला.
त्यावेळी देखील मोठी मदत आली. त्याची उतराई होण्यासाठी शहरातील संभाजी चौक येथील साई मंदिर रिक्षा चालक-मालक संघटनेकडून ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आला. त्यासाठी न्यू हिंद विजय क्रीडा मंडळ, सुधीर स्पोर्टस्चे अध्यक्ष बंटी सावंत यांचे सहकार्य लाभले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे धनादेश देताना सुनील चव्हाण, संतोष पाटील, विनायक पवार, नथुराम गुडेकर, साई पवार, मंगेश पवार, रमेश जाधव, ऋषिकेश ढगळे, प्रविण शितप, बंटी सावंत, मंदार काणेकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:45 PM 21-Oct-25














